'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, सेनाभवनासह मुंबईभर पोस्टर्स

'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, सेनाभवनासह मुंबईभर पोस्टर्स

युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता विरोधकांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेना युतीची अखेर घोषणा झाली असून हे दोन्ही पक्ष लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर आता विरोधकांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे.

'सत्तेला लाथ मारू' या ऐतिहासिक वाक्याला श्रद्धांजली, अशा आशयाची पोस्टर्स राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सेनाभवनासह मुंबईभर लावले आहेत.

शिवसेनेने चार वर्ष केवळ सत्तेतून बाहेर पडण्याच्या घोषणा दिल्या, मात्र निवडणुकीत युती केली, असं म्हणत आता विरोधकांकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या या बोचऱ्या टीकेनंतर आता शिवसेनाही पटलवार करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं. गेली चार वर्ष शिवसेना भाजपवर सातत्याने तुटून पडत होती. तर यापुढे युती नाही शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.

मात्र देशातली बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं सामंज्यस्याची भूमिका घेतली आणि युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं. या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप आणि शिवसेनेचे महत्त्वाचे सर्व नेते उपस्थित होते.

 

VIDEO : 'राजीनामे झिजले', युतीच्या घोषणेनंतर अजित पवारांची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 08:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading