Shivsena Poster: संजय राऊतांच्या घराबाहेर लागलं पोस्टर; तेरा घमंड तो चार दिन का है पगले...
Shivsena Poster: संजय राऊतांच्या घराबाहेर लागलं पोस्टर; तेरा घमंड तो चार दिन का है पगले...
शिवसेनेचा नुकताच 19 जूनला वर्धापन दिन साजरा झाला असताना लगेचच शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील प्रमुख नेत्यांसह आमदारांनी बंड केल्याने सरकारमध्ये आलबेल नव्हतं हे दिसून येत आहे.
मुंबई, 22 जून : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींची उलथापालथ होत असताना तिकडे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे पोस्टर लावले आहे. 'तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है' असा मजकूर लिहण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण येत असले तरी सध्या घडत असलेल राजकीय घडामोडींवरून संजय राऊत बॅकफूटवर गेले आहेत.
शिवसेनेचा नुकताच 19 जूनला वर्धापन दिन साजरा झाला असताना लगेचच शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील प्रमुख नेत्यांसह आमदारांनी बंड केल्याने सरकारमध्ये आलबेल नव्हतं हे दिसून येत आहे. शिवाय कोणत्याही आमदाराला बळजबरी केली नसून प्रत्येकजण आपल्या मर्जीने बंडात सामील झाल्याचे आत्तापर्यंत एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
हे वाचा - EXCLUSIVE : 'शिवसेना पुन्हा संघर्षाने उभी करु', आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांचा एल्गार
'विरोधकांना फार घमेंड चढला आहे. राज्यसभेत एखादी जागा इकडे तिकडे होत असते. फार घमेंड करू नका, एक जागा तुम्ही जिंकली असेल पण सगळी सूत्रे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याकडेच राहणार आहेत. फार घमेंड करू नका, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.' असं म्हणत संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला सुनावत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.
हे वाचा - शिवसेना आमदार उडाले भुर्रर्र...; आता गुवाहाटी ठरणार महाराष्ट्राच्या सत्ताबदलाचा पट
शिवसेनेचा 19 तारखेला 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. तोच धागा पकडत स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे पोस्टर राऊतांच्या घराबाहेर लावले आहे. मात्र, घडणाऱ्या घडामोडींवरून शिवसेनेचे मोठे नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.