News18 Lokmat

अखेर विधानसभेचं उपाध्यक्षपद जाणार शिवसेनेकडे

गेल्या 4 वर्षापासून रिक्त असलेलं विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 03:31 PM IST

अखेर विधानसभेचं उपाध्यक्षपद जाणार शिवसेनेकडे

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 28 नोव्हेंबर : गेल्या 4 वर्षापासून रिक्त असलेलं विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.  हे पद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. येत्या 30 तारखेला विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता, पण भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जात आहे.

हेही वाचा: गाडीमुळे गावकऱ्यांच्या अंगावर उडाला चिखल, काँग्रेस नेत्याला नाक घासून मागायला लावली माफी

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर लगेच निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

Loading...


VIDEO : डान्स करता करता तिला मृत्यूने गाठलं, सीएम चषक स्पर्धेत घटना


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2018 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...