मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लवकरच होणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लवकरच होणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 'लेटर वॉर

CM Uddhav Thackeray may meet Governor Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : विधान परिषदेच्या 12 जागांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. याच संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. प्रलंबित राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात ही बैठक असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

    जनआशीर्वाद यात्रेवरुन वातावरण तापणार, नारायण राणेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले

    मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात बैठक होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र, याबाबत कुठलीही अद्याप बैठक होणार नसल्याचं राजभावनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खरोखर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांची बैठक होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

    आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपालांची भेट घेणार असल्याचं वृत्त समोर आल्याने आता राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड लवकरच होईल अशीही चर्चा रंगत आहे. तसेच या संदर्भात राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात? याकडेही सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

    First published:

    Tags: Governor bhagat singh, Uddhav thackeray