काळजी घ्या! पुराच्या पाण्यातून होऊ शकतो हा नवा आजार

काळजी घ्या! पुराच्या पाण्यातून होऊ शकतो हा नवा आजार

पुराच्या पाण्यातून आजार होण्याचा धोका व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • Share this:

अलिबाग, 16 ऑक्टोबर : राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यातच आता पुराच्या पाण्यातून आजार होण्याचा धोका व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेल्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणावर अवकाळी पाऊस होवून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे साठलेल्या पाण्याच्या प्रत्यक्ष संपर्कातून लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादूर्भाव होण्याचा संभव आहे.

लेप्टोस्पायरोसिस या आजाराची ताप , थंडी , डोकेदुखी,कावीळ, लाल डोळे , स्नायूंचे दुखणे , पुरळ , अडकलेली मान , अतिसार साधारणत: ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसून येत असलेल्या नागरिकांनी दुर्लक्ष न करता तात्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करुन घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करुन घ्यावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

दरम्यान, पावसाच्या हाहाकाराचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच विविध संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीच्या रुपाने आणखी एक भयंकर संकट उभं ठाकलं आहे. मुसळधार पावसामुळे हाता-तोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं आहे. तसंच या पावसामुळे उर्वरित पिकांवर पडणाऱ्या रोगांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 16, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या