जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांनी केली अदलाबदल

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांनी केली अदलाबदल

छगन भुजबळ यांच्याकडे असलेले जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई,14 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत. या बदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे असलेले जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. आणि जयंत पाटील यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप नुकतेच करण्यात आले होते. जयंत पाटील यांच्याकडे वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार खाती देण्यात आली होती. तर छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत.

खातेवाटपानंतर जयंत पाटील होते नाराज?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले. मात्र, खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होता. एरव्ही पत्रकारांशी सहज बोलणारे जयंत पाटील यांनी मात्र 'नो कमेंट्स' (No Comments) असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले होते. यावरून वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याच्या नव्या चर्चेला उधाण आले आहे. जयंत पाटील गृह खात्यासाठी आग्रही होते. पण, हे खाते शिवसेनेने स्वत: कडे ठेवले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी आणि सहा मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितलं जात होतं मात्र महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद असल्याने ते जाहीर करण्यात येत नव्हते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आले. यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. तर गृह आणि नगरविकास ही खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवली आहेत. तर नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात अजित पवारांसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असेल असे, सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या