खातेवाटपानंतर जयंत पाटील नाराज? No Comments नी नव्या चर्चेला उधाण

खातेवाटपानंतर जयंत पाटील नाराज? No Comments नी नव्या चर्चेला उधाण

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • Share this:

सागर कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई, 12 डिसेंबर: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी खातेवाटप जाहीर केले आहे. मात्र, खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नाराज दिसत आहेत. एरव्ही पत्रकारांशी सहज बोलणारे जयंत पाटील यांनी मात्र 'नो कमेंट्स' (No Comments) असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. यावरून वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याच्या नव्या चर्चेला उधाण आले आहे.

जयंत पाटील गृह खात्यासाठी आग्रही होते. पण, हे खाते शिवसेनेने स्वत: कडे ठेवले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी आणि सहा मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितलं जात होतं मात्र महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद असल्याने ते जाहीर करण्यात येत नव्हते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला. यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. तर गृह आणि नगरविकास ही खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवली आहेत. तर नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात अजित पवारांसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असेल असे, सांगितले जात आहे.

असं आहे खातेवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- माहिती जनसंपर्क, सामान्य प्रशासन आणि इतर मंत्र्यांकडे नसलेली सर्व खाती

शिवसेना

एकनाथ शिंदे- गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास

काँग्रेस

बाळासाहेब थोरात - महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेक शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

नितीन राऊत- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

राष्ट्रवादी

जयंत पाटील- वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास

छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 06:24 PM IST

ताज्या बातम्या