'शोले'मधील 'कालिया' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

शोले' चित्रपटातील 'कालिया' ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 11:22 AM IST

'शोले'मधील 'कालिया' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मुंबई, 30 सप्टेंबर: 'शोले' चित्रपटातील 'कालिया' ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गायदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेल्या शोले चित्रपटातील 'सरदार, मैंने आपका नमक खाया है'; या संवादामुळे विजू खोटे यांना वेगळी ओळख मिळाली होती. विजू खोटे यांनी हिंदी आणि मराठी भाषेतील 300हून अधिक चित्रपटात काम केले होते. विजू यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी विनोदी अभिनेता हरपला अशी भावना चित्रपट क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मराठीमधील अशी ही 'बनवाबनवी', 'आयत्या बिळावर नागोबा', 'या मालक' या चित्रपटांमधील त्यांची भूमिका गाजली होती.

'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' ही व्यक्तीरेखा देखील विजू यांनी लोकप्रिय केली होती. त्यातील त्यांची 'गलती से मिस्टेक हो गया' हा डायलॉग आज देखील अनेकांच्या तोडी ऐकायला मिळतो. मराठी हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक वर्षे नाटकांमध्ये देखील काम केले होते. छोट्या पडद्यावरील मालिकेत विजू यांनी आपल्या अभिनयाची छाप टाकली होती. 'जबान संभाल के' या मालिकेतील त्यांनी साकारलेली व्यक्तीरेखा रसिकांच्या स्मरणात आहे.

विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे देखील अभिनेते होते. त्यांनी अनेक मूक चित्रपटांमध्ये काम केले होते.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...