S M L

मुंबई कुणाची? पूनम महाजन vs प्रिया दत्त, उत्तर मध्य मुंबईत चुरस

उच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची कसोटी लागणार आहे. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी उशिरा रिंगणात उतरूनही त्यांना कडवं आव्हान दिलं आहे.

Updated On: Apr 25, 2019 07:38 PM IST

मुंबई कुणाची? पूनम महाजन vs प्रिया दत्त, उत्तर मध्य मुंबईत चुरस

विवेक कुलकर्णी

मुंबई, 25 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईच्या बड्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा मिळाला होता. पण यावेळी मात्र युतीला आघाडी जोरदार टक्कर देणार, अशी चर्चा आहे.

संमिश्र मतदारसंघ


उच्चभ्रू आणि गरीब असे दोन्ही मतदार असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची कसोटी लागणार आहे. पूनम महाजन या भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचं संघटनात्मक पाठबळ आहे. त्यांनी आतापर्यंत केलेलं काम पुस्तिका काढून त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवलं आहे. तरीही नोटबंदी, जीएसटी यासारखे भाजप सरकारच्या विरोधात जाणारे मुद्दे हे त्यांच्यासमोरही आव्हान आहेत.

प्रिया दत्त उशिरा रिंगणात

दुसरीकडे प्रिया दत्त यांनी आधी इथून निवडणूक लढलवण्याचा निर्णय उशिरा घेतला. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसू शकतो. कुर्ला, बांद्रा, विलेपार्ले अशा भागात मतदारांशी या दोन्ही उमेदवार किती संपर्क साधू शकतात त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Loading...

चुरशीच्या लढती

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

======================================================================================

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 07:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close