उत्तर भारतीय मुंबईची शान,पूनम महाजनांची मुक्ताफळं

उत्तर भारतीय मुंबईची शान,पूनम महाजनांची मुक्ताफळं

उत्तर भारतीय मुंबईची शान असून त्यांच्याअभावी ५० टक्के मुंबई बंद पडेल,' असे वक्तव्य करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन यांनी नव्या वादाला फोडणी दिली

  • Share this:

मुंबई, 21नोव्हेंबर :उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचं वादग्रस्त वक्तव्य पूनम महाजन यांनी केलं आहे. तसंच उत्तर भारतीय नसतील तर 50 टक्के मुंबई बंद पडेल असं विधानही त्यांनी केलं आहे.

'उत्तर भारतीय मुंबईची शान असून त्यांच्याअभावी ५० टक्के मुंबई बंद पडेल,' असे वक्तव्य करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन यांनी नव्या वादाला फोडणी दिली. साकीनाका येथे साई-श्रद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्तर भारतीय संमेलनादरम्यान महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून सुरू असलेली ही मोर्चेबांधणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे मनसेने त्यांच्यावरती टीका केली आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंनी भाजप ही मुंबईची घाण असं संबोधलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण पेटतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading