बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवासैनिक नाराज, पूनम महाजन मातोश्रीवर?

बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवासैनिक नाराज, पूनम महाजन मातोश्रीवर?

पूनम महाजन यांनी रविवारी दुपारी 1च्या सुमारास मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. तत्पूर्वीच आदित्य ठाकरे मातोश्रीवर दाखल होते.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 31 मार्च : भाजप खासदार पूनम महाजन या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेल्या होत्या. यावेळी आदित्य ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं पुनम महाजन यांनी सांगितलं होतं.पण पूनम महाजन यांच्या मतदारसंघात जे होर्डींग लावले होते ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी स्वत:ला प्रेसेंट केलं. मात्र, या होर्डिंगमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं युवासैनिक नाराज झाल्याची चर्चा होती. या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

पूनम महाजन यांनी रविवारी दुपारी 1च्या सुमारास मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. तत्पूर्वीच आदित्य ठाकरे मातोश्रीवर दाखल होते. आदित्य ठाकरे यांचा फोटो महायुतीच्या पोस्टरवर नव्हता त्यावरून सेनेत काहीशी नाराजी होती. त्यामुळे पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली अशी चर्चा सर्वत्र आहे. तर निडणुकींपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी आपण मातोश्रीवर जाणार असल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं.

उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे होर्डिॉग लावले होते. त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काल वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती.  त्यामुळे धास्तावलेल्या पूनम महाजन आज मातोश्रीवर आल्या आहेत असंही बोललं जात आहे.

VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचं वऱ्हाड, इंजिनिअर प्रियांकाचा थाटच न्यारा

First published: March 31, 2019, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading