आदित्य ठाकरे - पुनम महाजन यांच्यात दिलजमाई?

आदित्य ठाकरे आणि पुनम महजन यांच्यामध्ये दिलजमाई झाली अशी चर्चा आता रंगली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 03:53 PM IST

आदित्य ठाकरे - पुनम महाजन यांच्यात दिलजमाई?

मुंबई, 31 मार्च : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि पुनम महाजन यांच्यात दिलजमाई झाली की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण भाजप खासदार पुनम महाजन या 'मातोश्री'वर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली. पुनम महाजन आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. शिवाय, युवासैनिक देखील नाराज होते. पण, त्यावर आता पडदा पडल्याचं बोललं जात आहे. कारण पुनम महाजन ज्यावेळी 'मातोश्री'वर गेल्या त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांची देखील भेट घेतली. या दोघांचा हात मिळवणी करतानाचा फोटो देखील आता समोर आला आहे. त्यामुळे दोघांमधील वादावर आता पडदा पडल्याचं बोललं जात आहे.




का होती नाराजी

Loading...

पूनम महाजन यांच्या मतदारसंघात जे होर्डिंग्स लावले होते ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी स्वत:ला प्रेसेंट केलं. मात्र, या होर्डिंग्समध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं युवासैनिक नाराज झाल्याची चर्चा होती. या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा आहे.

पूनम महाजन यांनी दुपारी 1च्या सुमारास 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे देखील 'मातोश्री'वर होते. आदित्य ठाकरे यांचा फोटो महायुतीच्या पोस्टरवर नव्हता. त्यावरून सेनेत काहीशी नाराजी होती. त्यामुळे पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली अशी चर्चा सर्वत्र आहे. तर, निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी आपण 'मातोश्री'वर गेल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे होर्डिग्स लावले होते. त्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काल वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती. त्यामुळे धास्तावलेल्या पूनम महाजन आज 'मातोश्री'वर आल्या असंही बोललं जात आहे.


VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचं वऱ्हाड, इंजिनिअर प्रियांकाचा थाटच न्यारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...