संजय राठोड यांची अवघ्या काही तासांत पडणार 'विकेट', उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली

संजय राठोड यांची अवघ्या काही तासांत पडणार 'विकेट', उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली

वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे पुरते अडचणीत सापडले आहे. अखेर शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना आता राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे. पुढील काही तासांतच संजय राठोड त्यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड असलेला फोटो राऊत यांनी ट्वीट केला आहे. 'शिवरायांच्या हातातला हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!' असा मजकूर या फोटोवर लिहिलेला आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनामाच्या चर्चेला उधाण आले आहे.

तर राज्य सरकारच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, अधिवेशनात सरकार प्रतिमा मलिन होऊन नये, विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी शिवसेनेकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

आज चहापानापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या प्रतिमेवर चर्चा होणार आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. पण शिवसेनेच्या काही मंत्री, आमदारांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप झाले होते. पण, त्यानंतर महिलेनं तक्रार मागे घेतली होती. पण आरोपच काय? असा सवालही सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

Published by: sachin Salve
First published: February 28, 2021, 1:14 PM IST

ताज्या बातम्या