मुंबईतील मोकळी मैदानं पुन्हा राजकारण्यांच्या घशात?

मुंबईतील मोकळी मैदानं पुन्हा राजकारण्यांच्या घशात?

मोकळ्या मैदानांच्या बाबतीला एक महत्त्वपूर्ण निर्णय सभागृहानं मंजूर केलाय. मैदानांची चांगली देखरेख न करणाऱ्या १२८ संस्थांकडून परत घेतलेली मैदानं नव्या संस्थांना देण्यात येणार आहे.

  • Share this:

24 नोव्हेंबर : मुंबईतली मोकळी मैदानं पुन्हा राजकारण्यांच्या घशात जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोकळ्या मैदानांच्या बाबतीला एक महत्त्वपूर्ण निर्णय  सभागृहानं मंजूर केलाय. मैदानांची चांगली देखरेख न करणाऱ्या १२८ संस्थांकडून परत घेतलेली मैदानं नव्या संस्थांना देण्यात येणार आहे.

मैदानं कुणाला द्यायची याच्यासाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीमध्ये सुधार समिती, मैदाने आणि उद्यान समिती आणि स्थानिक नगरसेवकांना सामावून घेतलंय. त्यामुळे आता कोणाच्या संस्थेला मैदान द्यायचं हा निर्णय राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हातात गेल्यानं पुन्हा कुंपणच शेत खातं अशी परिस्थिती निर्माण होईल.

यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी अशी मैदानं आपल्या संस्थांसाठी आंदण दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 12:02 PM IST

ताज्या बातम्या