मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /‘आधी मंत्र्यांना क्वारंटाइन करा’, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली

‘आधी मंत्र्यांना क्वारंटाइन करा’, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली

'जितेंद्र आव्हाड, दत्ता भरणे, वर्षा गायकवाड यानी दौरे केले त्यावेळी त्यांना क्वारंटाइन केलंत का?  गृहमंत्री अनिल देशमुखांना क्वारंटाईन केलंत का?'

'जितेंद्र आव्हाड, दत्ता भरणे, वर्षा गायकवाड यानी दौरे केले त्यावेळी त्यांना क्वारंटाइन केलंत का? गृहमंत्री अनिल देशमुखांना क्वारंटाईन केलंत का?'

'जितेंद्र आव्हाड, दत्ता भरणे, वर्षा गायकवाड यानी दौरे केले त्यावेळी त्यांना क्वारंटाइन केलंत का? गृहमंत्री अनिल देशमुखांना क्वारंटाईन केलंत का?'

रत्नागिरी 20 मे: विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रविण दरेकर हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरून भाजप आणि शिवसेनेच चांगलच वातावरण तापलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी दरेकर यांच्या दौऱ्याला आक्षेप घेतला. दरेकर आणि त्यांच्या सहकारी रेड झोन मधून आल्यामुळे आमदारांनी आधी क्वारंटाईन व्हावं. भाजप आमदारांच्याच फिरण्यामुळे कोरोना प्रसाराची भीती सामंत यानी केली व्यक्त केली तर आधी मंत्र्यांना क्वारंटाइन करा असा पलटवार भाजपचे नेते दरेकर यांनी केलाय.

सध्या मंत्री दौरे करत आहेत. जितेंद्र आव्हाड, दत्ता भरणे, वर्षा गायकवाड यानी दौरे केले त्यावेळी त्यांना क्वारंटाइन केलंत का?  गृहमंत्री अनिल देशमुखांना क्वारंटाईन केलंत का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही जनतेला दिलासा देण्यासाठी फिरतोय. आमच्याकडे सर्व परवानग्या आहेत असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेने कोकणला वाऱ्यावर सोडलंय. एस.टीने चाकरमान्यांना कोकणात का आणले नाही? असा सवालही त्यांनी केला. कोकणात आलेल्या मुंबईकरांची व्यवस्था करण्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यानीच जनतेला आव्हान केलंय की कोकणात जाऊ नका म्हणून असंही ते म्हणाले.

Amphan Cyclone : वादळात उडाली शेड आणि बराच वेळ उडत राहिल्या ठिणग्या, पाहा VIDEO

स्वॅब टेस्टींग लॅबसाठी आम्ही भाजपचे पाच विधनपरिषद आमदार प्रत्येकी वीस लाख देण्यास तयार आहोत असंही त्यांनी सांगितलं. नारायण राणेंचे हॉस्पिटल स्वॅब टेस्ट लॅबसाठी न घेण्यात उदय सामंत यांचे राजकारण आहे असा आरोपही त्यांनी केला.

हे वाचा -

बापासह सायकलवरुन 1000 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीच्या शिक्षणासाठी सरकारचा

भयंकर! ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा अभावी घरातच मृत्यू

First published:
top videos

    Tags: Coronavirus