मुंबईत कॉंग्रेसच्या मुलाखतीला अनेक नेत्यांची दांडी, कृपाशंकर सिंह यांनी भरला नाही अर्ज

मुंबईत कॉंग्रेसच्या मुलाखतीला अनेक नेत्यांची दांडी, कृपाशंकर सिंह यांनी भरला नाही अर्ज

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील या नेत्यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, मुलाखतीला अनेक नेत्यांची दांडी मारली. काही नेत्यांनी तर अक्षरश: काहीही कारणे देत पाठ फिरवली..

  • Share this:

मुंबई, 31 जुलै- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील या नेत्यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, मुलाखतीला अनेक नेत्यांची दांडी मारली. काही नेत्यांनी तर  अक्षरश:  काहीही कारणे देत पाठ फिरवली. टिळक भवन येथे दोन दिवस मुलाखती घेण्यात आल्या. 36 विधानसभा मतदार संघ निवडणूक इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

कृपाशंकर सिंह यांनी भरला नाही अर्ज..

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांना कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाबाबत अर्ज ही केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मालाड आमदार असलम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच शेख यांनी मुलाखतींसाठी आले नाही. यावरून कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असलम शेख (मालाड), कृपाशंकर सिंह (कलिना), वर्षा गायकवाड (धारावी), अमिन पटेल (मुंबादेवी) या विधानसभा मुलाखतीतला नेत्यांची पाठ फिरवली. काही नेत्यांनी वैयक्तिक कामामुळे येणे शक्य नसल्याचे कळवले. पण कृपाशंकर सिंग, असलम शेख हे मात्र भाजपा शिवसेनेत जाणार याची जोरदार राजकीय चर्चा असतानाच हे नेते मुलाखतीत गैहजर राहिल्यावरून चर्चेने आणखी जोर धरला आहे. कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान काही आमदार यांनी मुलाखतीस आले नाही, हे खरे पण विद्यमान आणि ज्येष्ठ आमदार आले. मुंबईतील मुलाखतींसाठी चांगला प्रतिसाद मिळाला, असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सांगितले आहे.

भाजप जोमात, विरोधक कोमात!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर होते.

शरद पवारांबद्दल सांगताना चित्रा वाघ यांचा गळा आला भरून, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2019 10:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading