VIDEO : भरपावसात महिला काँस्टेबल आॅन ड्युटी,वृद्धांना केली मदत

VIDEO : भरपावसात महिला काँस्टेबल आॅन ड्युटी,वृद्धांना केली मदत

  • Share this:

 मुंबई, 09 जुलै :कर्तव्य दक्ष महिला पोलीस कॉन्सटेबलचा एक व्हिडिओ समोर आलाय. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात जोरदार पाऊस बरसतोय. यामुळे अनेक भागात पाणी साचलंय. मुंबईच्या हिंदमात परिसरात देखील जोरदार पावसामुळे पाणी साचलं होतं. यावेळी तेथे आपलं कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलीस काँस्टेबलनं तेथून जाणाऱ्या एक वृद्ध जोडप्याला त्या पाण्यात वाट दाखवली आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढलं. कमरेभर पाण्यात उभं राहून ही पोलीस आपलं कर्तव्य बजावत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 07:00 PM IST

ताज्या बातम्या