मुंबई, 8 मे : मुंबईकरांना तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालवता यावेत या हेतूने मुंबई पोलिसांनी
(Mumbai Police) 'संडे स्ट्रीट'
(Sunday Street) ही संकल्पना 27 मार्च 2022 पासून सुरू केली आहे. त्याच अंतर्गत आज मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे यांनी बासरीचे सुरेल असे वादन केले. दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेले कलाकार बाहेर आले आणि त्यांनी बासरीच्या तालावर बॉर्डरचे गाणे वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
काय आहे संडे स्ट्रीड प्रोग्राम -
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर आली आहे. निर्बंधांमुळे गेले दोन वर्ष धावती मुंबईला ब्रेक लागला होता. अनेकजण ताण तणावात जीवन जगत आहेत. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू झाला आहे. मुंबईतील 13 रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जात आहे.
बासरीद्वारे सुरेल वादन -
मुंबई पोलिसांकडून दर रविवारी संडे स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आतील कलाकार बाहेर आला. यानंतर त्यांनी जे केले त्यामुळे सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. दादासाहेब कुळे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत आहेत. संडे स्ट्रीट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेला कलाकार बाहेर आला आणि त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
हेही वाचा - EXCLUSIVE : किरीट सोमय्यांवर हल्ला, आता नवा वाद, मुंबई पोलीस आयुक्तांचं थेट CISF महासंचालकांना पत्र
27 मार्च 2022 रोजी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी पथदर्शी प्रकल्प म्हणून एक अनोखा उपक्रम सुरू केला. त्यातच रविवारी मुंबईतील 13 रस्ते तीन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांना आनंद देणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे रस्ते खुले असतील. या दरम्यान रस्त्यावर चालणे, सायकलिंग, स्केटिंग, योगासने करता येतात व मुले खेळू शकतात. आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.