मुंबई, 04 जून : मुंबईसह अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर आत्तापर्यंत कित्येकवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, तरी देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि रेल्वेत चढता उतरताना किंवा स्थानक परिसरात योग्य खबरदारी घेत नसल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई (Mumbai)तील डॉक यार्ड रेल्वे स्थानकात (Dock Yard railway station in Mumbai) घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यावेळीही पोलिसांनी खबरदारी दाखवत एका व्यक्तीचे प्राण वाचवले.
एक व्यक्ती स्थानकामध्ये रेल्वे सुटण्याच्या वेळी नेमकी दरवाजातून आत जाण्याच प्रयत्न करत होती. मात्र, त्यावेळी रेल्वे सुरू झाल्यानं त्यांचा तोल गेला आणि ते गाडीतून खाली पडले. हा सर्व प्रकार फलाट क्रमांक 1 वर घडला. त्या फलाटावर तैनात असलेल्या जीआरपीएफ सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले आणि रेल्वे खाली जाण्यापासून त्यांना वाचवलं. ही सर्व घटना रेल्वे स्थानकातील फलाटावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्यक्तीचे नाव सादिक शेख असे असल्याचे सांगण्यात येत असून ते वयोवृद्ध आहेत.
डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर देवदूतासारखे धावले GRP जवान; वाचवले प्रवाशाचे प्राण#Mumbai pic.twitter.com/hdO4GLfpnD
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2021
गेल्या काही दिवसांपूर्वी एक्सप्रेस ट्रेनखाली येणाऱ्या एका लहान मुलाला वाचवतानाचा मुंबईतील एक थरकाप उडवणारा व्हिडिओ (Mumbai Railway Station Video) समोर आला होता. मयुर शेळके नावाच्या पॉईंटसमनने लहान मुलाला वाचवले होते, वांगणी स्थानकावर तो मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमकं त्याच वेळेला एक मेल-एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध होती, ती आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की नेमका तो कुठे पडला आणि तितक्यात उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने जोरदार वेगाने येत हाती.
हे वाचा - खळबळजनक! कोरोना आता घेतोय प्राण्यांचाही जीव; कोविड पॉझिटिव्ह सिंहाचा मृत्यू
तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येताना दिसली. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावताना दिसली. तो व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचला. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Mumbai, Mumbai local