News18 Lokmat

गाडी टोइंग प्रकरणाला वेगळं वळण, गाडी उचलू नये म्हणून बनाव,पोलिसांचा दावा

मुंबईतल्या टोइंग व्हॅन प्रकरणाला नवं वळण लागलंय. गाडी उचलून नेऊ नये म्हणून गाडीच्या मालकानंच बनाव रचल्याचं उघड झालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2017 08:05 PM IST

गाडी टोइंग प्रकरणाला वेगळं वळण, गाडी उचलू नये म्हणून बनाव,पोलिसांचा दावा

मुंबई, 12 नोव्हेंबर : मुंबईतल्या टोइंग व्हॅन प्रकरणाला नवं वळण लागलंय. गाडी उचलून नेऊ नये म्हणून गाडीच्या मालकानंच बनाव रचल्याचं उघड झालंय. महिला बाळासह गाडीत असताना पोलिसांनी गाडी टो केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मालाडमधल्या एस. व्ही. रोडवर हा प्रकार घडला होता. आणि या प्रकरणी संबंधित वाहतूक पोलिसावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली होती.

पण या प्रकरणातील वाहतूक पोलिसांनी मात्र वेगळाच दावा केलाय. आणि एक नवा व्हिडिओ प्रसारित झालाय. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे गाडी टो करत असताना संबंधित महिला गाडीत बसली. गाडी टो करत असताना बाळ वडिलांच्या कडेवर होतं. गाडी उचलली जाऊ नये म्हणून नवऱ्यानं बाळ बायकोकडे दिलं असं या व्हिडिओमध्ये दिसतंय.

पण या व्हिडीओनंतर पीडित महिलेनं त्याचंही स्पष्टीकरण दिलंय, पोलिसांनी गाडी टो केली तेव्हा आपण गाडीतच होतो, माझे पती त्या कॉन्स्टेबलला सांगत होते गाडी टो करु नका, त्यावेळी आपल्याकडे असलेलं बाळ रडायला लागल्यानं आपण गाडीतून बाहेर आलो, आणि बाळाला पतीकडे दिलं.  त्याच वेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...