मुंबईत पोलिसांची बारमध्ये धाड, 24 बारबाला करत होत्या अश्लील नृत्य ;11 जणांना घेतलं ताब्यात

मुंबईत पोलिसांची बारमध्ये धाड, 24 बारबाला करत होत्या अश्लील नृत्य ;11 जणांना घेतलं ताब्यात

नवीन वर्ष 2020 ला आता काही तास बाकी आहेत याकरिता मुंबई शहरामध्ये व उपनगरांमध्ये होणाऱ्या उत्साहाच्या ठिकाणी गर्दी आणि वाहतूक समस्या याकरिता मुंबई पोलीस दलाकडून मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

  • Share this:

सत्यम सिंग, प्रतिनिधी

मुंबई, 31 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज झाले आहे. मात्र, मुंबईतील अंधेरी परिसरात पोलिसांनी एका बारवर छापा टाकला आहे. या बारमध्ये 24 बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या.

अंधेरीच्या पिंक प्लाजा बारमध्ये पोलिसांनी संध्याकाळी धाड टाकली. या बारमध्ये 24 बारगर्ल या अश्लिल नृत्य करत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या बारबालांना ताब्यात घेतलं आहे. तसंच  7 ग्राहक, 2 मॅनेजर आणि 2 वेटर्सला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहे.

मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवीन वर्ष 2020 ला आता काही तास बाकी आहेत याकरिता मुंबई शहरामध्ये व उपनगरांमध्ये होणाऱ्या उत्साहाच्या ठिकाणी  गर्दी आणि वाहतूक समस्या याकरिता मुंबई पोलीस दलाकडून मोठी  सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या रात्री 40 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यावर  तैनात राहणार आहेत.

दरम्यान, वर्ष 2019 ला संपण्यासाठी अवघ्या काही तासांपेक्षा कमी वेळ आहे. यात नवीन वर्षाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी मायानगरी मुंब मध्ये मोठ्या संख्येनं लोकं मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र येतात यावेळी सुरक्षा व्यवस्था आणि लोकांना सुरक्षा निश्चित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत मुंबईतील रस्त्यावर मुंबई पोलिसांचा मोठा पहारा असणार आहे.

संपूर्ण मुंबई शहरामध्ये 40 हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी 31 डिसेंबरच्या रात्री तैनात राहणार आहेत. यासोबतच आरसीपी, क्यूआर टी, एसआरपीएफ, बीडीडीएस पथकही सोबत असणार आहे. संपूर्ण मुंबईत 5000 कॅमेरा निगराणीखाली असणार आहेत. यासोबत एक कंट्रोल रूम आणि यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारीही तैनात करण्यात  येणार आहेत.

महिलांच्या छेडछाडी घटना रोखण्यासाठी यावेळी साध्या कपड्यांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासोबत विशेष पथक ही तैनात केले जाणार आहेत. जास्तीच्या गर्दीच्या ठिकाणी जसे की गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि धार्मिक स्थळावर बाँबस्क्वॉड पथक तैनात करून विशेष तपासणी केली जाणार आहे.

यादरम्यान, हॉटेल्स लॉज तपासणी केली जाणार असून मुंबई पोलीस हॉटेल आणि लॉज मालकासोबत एक बैठक नुकतीच झाली आहे. समुद्राच्या किनारी बोट कोम्बिंग केली जाणार आहेत. आणि त्यांची तपासणी केली जाणार आहे ड्रंक ड्रायव्हिंग यावर मुंबई पोलिसांची खास नजर असणार आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात  जर कुणाला काही अनुचित प्रकाराला सामोरं जावं लागलं तर त्यांनी 100 नंबर डायल करून किंवा ट्विटरवर मुंबई पोलिसांना संपर्क करू शकतात.

याशिवाय वाहतूक विभाग पोलीस ड्रिंक अँड ड्राइव्ह  ड्रायव्हिंग करणाऱ्यांना पकडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात आणि उपनगरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आले आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह थांबविण्याकरिता विशेष कॅमेरे लावले आहेत.  कंट्रोल रूम वाहतूक नियम तोडणाऱ्याला आणि दारू पिऊन गाडी चालवणारा पकडण्याकरिता हे ठिकाण बनवण्यात आले आहेत. कोणत्याही महिलेला असुरक्षित वाटत असेल तर त्यांना जवळील पोलीस व्हॅनमध्ये मदत मिळू शकते रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत गर्दीच्या ठिकाणी काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. 433 लोकावर मागील वर्षी कारवाई करण्यात आली होती. या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

First published: December 31, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading