भिवंडी 09 ऑक्टोबर: हुक्का पार्लरवर बंदी असताना भिवंडी शहरात अशा बेकायदा पार्लरचं पेव फुटलं होतं. पोलिसांनी आता कारवाई करत अशा पार्लरचं कंबरडं मोडलं असून पार्लरसाठी लागणारा तब्बल 3 कोटींचा माल जप्त केला आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही धडक करावाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त केलं. अल अकबर नावाने उपयोगात येणारे तंबाखूजन्य पदार्थ यांचा गोदामात मोठा साठा करून ठेवल्याची खात्रीलायक वृत्त नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली होती.
त्यांनी वळ ग्रामपंचायत क्षेत्रातील पारसनाथ गोदाम संकुलातील इमारत क्रमांक E-4 मधील गाळा क्रमांक 14, 15 व इमारत क्रमांक D-3 मधील गाळा क्रमांक 6-7 या चार गोदामांवर व पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एकूण चार गोदामात साठवलेले हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले. यात अल अकबर कंपनीच्या सुगंधित तंबाखूचा 3 कोटी 8 लाख 96 हजार 760 रुपयांच्या साठ्याचा समावेश आहे. गोदाम मालक इरफान मो.अमीन सिद्दीकी आणि गोदाम व्यवस्थापक फैसल रईस खान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'एक शूज घ्या आणि त्यावर Corona फ्री मिळवा', पाहा हे PHOTO आणि काय म्हणायचं सांगा
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिरसाठ हे करीत असून या गुन्ह्यातील आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही. एवढा मोठा साठा जप्त केल्यानंतर या माध्यमातून बंदी असलेल्या हुक्का पार्लर चालकांचे कंबरडे मोडले जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.