छमछम सुरूच.. 'काका बार'वर छापा, अश्लील नृत्य करताना आढळल्या बारबाला

छमछम सुरूच.. 'काका बार'वर छापा, अश्लील नृत्य करताना आढळल्या बारबाला

बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचेही या कारवाईत समोर आले आहे.

  • Share this:

मुंबई,2 नोव्हेंबर: महाराष्ट्रात काही अटींवर डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी असली आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात काही बारमध्ये 'गोरखधंदा' सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मालाडमधील एका बारवर छापा टाकून पोलिसांनी 22 जणांवर कारवाई केली. बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचेही या कारवाईत समोर आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मालाड येथील एक जुन्या प्रसिद्ध मंदिराजवळ सुरू असलेल्या काका बार आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकला. मालाड येथील पोलादर रोडवरील लक्ष्मी नारायण मॉलमध्ये हा बार आहे. पोलिसांनी या कारवाईत 93 हजार 930 रुपयांसह म्युझिक सीस्टिम जप्त केले आहे.

काका बार आणि रेस्टॉरंटमध्ये डान्स बार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास बारवर सापळा रचून छापा मारला असता 10 बारबाला अश्लील डान्स करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका करून तब्बल 22 जणांवर कारवाई केली. यात 14 ग्राहक, 5 कर्मचारी तसेच व्यवस्थापक, कॅशिअरचा समावेश आहे. सगळ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिपदीप लांडे यांनी दिली आहे. आरोपींवर दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोली पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात काही अटींवर डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी असे प्रकार सुरू ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे पोलिसांची अशा 'डान्स बार'वर करडी नजर आहे.

दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान राडा, गाड्यांची केली जाळपोळ, पाहा हा VIDEO

First Published: Nov 2, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading