मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय, देवेंद्र फडणवीसांचा खळबळनजक आरोप

मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय, देवेंद्र फडणवीसांचा खळबळनजक आरोप

'हिरेन यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यासोबत त्यांच्या पत्नीचा जबाब महत्वाचा आहे. वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते'

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : मुंबईला हादरावून सोडणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (maharashtra budget session 2021) खळबळजनक दावा केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे (sachin waze) यांनी केल्याचा संशय फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अधिवेशनात एकच खळबळ उडाली.

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला.

72 लाख बेस प्राइज विक्री झाली 512 कोटींना! खेळाडू नव्हे तर दारु दुकानाचा लिलाव

'हिरेन यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यासोबत त्यांच्या पत्नीचा जबाब महत्वाचा आहे. वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ वाझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करु घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असं सांगितले', असा खुलासा फडणवीस यांनी केला.

अयोध्येत बनणार श्रीरामांचे भव्य स्मारक, मराठमोळे मूर्तीकार साकारणार मूर्ती

तसंच, 'मनसुख यांनी भावाशी वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होतं. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून 40  लाखांनी खंडणी मागितली. या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली.  मनसुख यांचं शेवटचं लोकेशन गावडेकडे होतं आणि त्या नंतर 40 किमी दूर मृतदेह आहे. मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला' असंही फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना 202 गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी. सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.  फडणवीस यांच्या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

Published by: sachin Salve
First published: March 9, 2021, 12:23 PM IST

ताज्या बातम्या