टेंशन वाढलं! पोलिसांनी पकडलेला आरोपी Covid Positive, क्वारंटाईन सेंटरमधूनही काढला पळ

टेंशन वाढलं! पोलिसांनी पकडलेला आरोपी Covid Positive, क्वारंटाईन सेंटरमधूनही काढला पळ

corona कोरोनावरील उपचारासाठी या चोराला कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं. पण चोराला याठिकाणी पळून जाण्याची संधी मिळाली आणि त्यानं तिचा फायदा घेत पलायन केलं.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : कोरोनाच्या संकटामध्ये (coronavirus) एका रुग्णामुळं दुसऱ्याला संसर्ग पसरू न देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून कोरोनाचा संसर्ग (cororna infection) टाळला जात आहे. पण काही विचित्र घटनांमुळं प्रशासनाच्या या प्रयत्नात अडचणी येत आहेत. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात असलेल्या एका चोरामुळं (thief) पोलिसाचं टेन्शन अधिक वाढलंय. (corona patient fled from quarantine centre)

पोलिस विविध गुन्ह्यांमधील चोरांच्या मागावर राहत असतात. अशाच एका चोराला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. पण पोलिसांनी अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये हा चोर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच या चोराची व्यवस्था क्वारंटाईन सेंटरमध्ये केली. कांदिवली याठिकाणी असलेल्या विलगीकरण केंद्रांमध्ये या चोराला विलगीकरणात ठेवण्यात आलं.

हे ही वाचा-विमा कंपन्यांनी 1 तासात निकाली काढावे Covid रुग्णांचे कॅशलेस क्लेम : IRDAI

पोलिसांनी कोरोनावरील उपचारासाठी या चोराला कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं. पण चोराला याठिकाणी पळून जाण्याची संधी मिळाली आणि त्यानं तिचा फायदा घेत पलायन केलं. या कोविड सेंटरमधून चोर पळून गेल्यानंतर आता पोलिसांचं आणि प्रशासनाचं टेन्शन अधिक वाढलं आहे.

या चोराला कोरोनाची लागण झालेली असल्यामुळं पळून गेल्यानंतर आता तो ज्यांच्या संपर्कात येईल त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीत या चोराला पकडण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र अशा घटनांमुळं एकूणच प्रशासन आणि पोलिसांवरचा ताणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यात शंका नाही.

Published by: News18 Desk
First published: April 30, 2021, 9:08 PM IST

ताज्या बातम्या