हजारो मजुरांसाठी धावून आले पोलीस अधिकारी, टोप्या ते दूध अशी केली मदत

हजारो मजुरांसाठी धावून आले पोलीस अधिकारी, टोप्या ते दूध अशी केली मदत

अनेक मजूर पायी चालत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या लहाण पोरा-बाळांसह अनवानी पायी भुकेल्या पोटी पायपीट करत आहेत.

  • Share this:

ठाणे, 11 मे : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. यात लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलिसांनी पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. मास्क, दूध. जेवण अशा अनेक महत्त्वाच्या वस्तूंची मदत केली आहे.

यासाठी विभाग उप अधीक्षक हांडे, कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभाग यांच्या पथकाने आपले 'शासकीय कर्तव्य बजावून आपण देखील या समाजाचे घटक आहोत, आपली देखील काहीतरी सामाजिक बांधीलकी आहे. या दृष्टिकोनातून covid 19 महामारीच्या काळात परप्रांतीय मजुरांना मदत केली आहे.

अनेक मजूर पायी चालत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या लहाण पोरा-बाळांसह अनवानी पायी भुकेल्या पोटी पायपीट करत आहेत. असे हजारो मजुर माणकोली नाका भिवंडी बायपासच्या पुलाखाली आहेत. या लोकांना निरीक्षक राज्य उत्पादन कल्याण यांच्या पथकाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन माणुसकी जपली आहे. या कार्यात निरीक्षक नंदकिशोर मोरे, कल्याणविभाग दुयम निरीक्षक सुजित कपाटे व विक्रांत जाधव जवान एस डी पवार, एच डी खरबस, साळवे यांनी सहभाग घेतला. तसेच भैख सेवा समिती भिवंडी व जैन सोशल युवा ग्रूप यांचेही सहकार्य लाभलं.

वाटप करण्यात आलेल्या वस्तू

- जेवणाचे पाकीटे 2000 कंटेनर

- सुकी भेळ 100 पुडे

- दुध पावडर 100 पाकीटे

- आर एल 100 पाकीट

- टोप्या 300 नग

- गुळ पापडी 200 नग

- मास्क 1000 नग

- बिस्लेरी 1000 बॉटल्स

पुणे पालिका अधिकारी मेटाकुटीला; 5 स्टारमधील क्वारंटाईन नागरिकांमुळे उडाली झोप

मुंबई, पुणे सोडून राज्यात या तीन ठिकाणी झाला कोरोनाचा उद्रेक, पाहा अपडेट

First published: May 11, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading