Home /News /mumbai /

...तरी देखील शरद पवारांच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवला नाही, FIR मध्ये धक्कादायक खुलासा

...तरी देखील शरद पवारांच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवला नाही, FIR मध्ये धक्कादायक खुलासा

7 एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी दिले होते चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता

मुंबई, 09 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी (ST Employees protest outside Sharad Pawar residence) कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राडा घातल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी जाणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण तरी सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवला नव्हता, असं पोलिसांच्या एफआयआरमध्ये (police fir) उघड झालं आहे. पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता. या प्रकरणाची  FIR कॉपी NEWS 18 लोकमतच्या हाती लागली आहे.  या FIR मध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. ८ तारखेला दुपारी ३ वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते.  पण ७ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही. ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी दिले होते चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. (सोमय्या हजर व्हा..! किरीट- नील सोमय्यांच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा गुन्हा दाखल) या प्रतिक्रियेला प्रेरीत होवून आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच पोलिसांना  माहिती मिळाली होती. आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरी देखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. (IPL 2022 : टीम बदलली, स्टाईल नाही! तेवातियानं केली धोनीची बरोबरी) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या   मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Sharad Pawar (Politician), St bus, Stricke

पुढील बातम्या