Home /News /mumbai /

गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न अपयशी

गुवाहटीत शिवसेना नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न अपयशी

बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलजवळ शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले पोहोचले होते.

    गुवाहाटी, 24 जून : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी गुवाहाटी येथे गेलेल्या एका शिवसेनेच्या नेत्याला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 37 आमदारांना पुन्हा मुंबईत येण्याची साद घातली जात आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि इतर अनेक नेत्यांनी तसे प्रयत्न केले. मात्र शिंदे गट आपल्या भूमिकवर ठाम आहे. बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलजवळ शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले पोहोचले होते. त्यावेळी त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय भोसले हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करत होते. एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल आज मी गुवाहाटीला पोहोचलो असून पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांना 'मातोश्री'वर परतण्याचे आवाहन केल्याचे संजय भोसले यांनी सांगितले. शिवसेनेने आपल्या आमदारांना खूप काही दिले आहे. संजय भोसल एक पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते. "शिवसेना जिंदाबाद. एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला. उद्धवजींना, आदित्यजींना साथ द्या", असं त्यांनी पोस्टरवर लिहिलं होतं. यावेळी आसाम पोलिसांनी हा परिसर संवेदनशील असल्याचे सांगत भोसले यांना ताब्यात घेतलं. कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आसाममध्ये महाराष्ट्राचे आमदार राहतात का हे माहित नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचं अजब वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी थेट सांगून टाकले. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या