Home /News /mumbai /

मनसे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, 12 तासांआधी मनसेनं निवडला वेगळा पर्याय

मनसे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, 12 तासांआधी मनसेनं निवडला वेगळा पर्याय

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेनं घेतली आक्रमक भूमिका

    मुंबई, 25 नोव्हेंबर: वाढीव वीज बिलाच्या (Electricity Bill) मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) (MNS)आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्या, 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे झटका मोर्चा काढणार असल्याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मात्र, मनसेच्या उद्या होणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही मोर्चा होणार असून सरकारला झटका देण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जमाव बंदी लागू आहे. त्यामुळे पोलिसांनी मनसे मोर्चाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या उद्याच्या मोर्चाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. हेही वाचा...6 वर्षाय चिमुरड्यानं बघितले अनैतिक संबंध, बदनामी होईल म्हणून तरुणानं काढला त्याचा काटा! कोरोना लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिलास सवलत देण्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिलं होतं. ते सरकारनं पाळलं नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणारच असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. मनसेकडून 26 नोव्हेंबरला वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. मनसेचे राज्यभरातील मोर्चे अत्यंत शांतपणे काढले जातील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.  राज्य सरकारनं वीज दरवाढीत सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही. आता पुन्हा एकदा 100 युनिटपर्यंत सूट देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री देत आहेत. या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे, अशी टीका नांदगावकर यांनी यावेळी केली. हेही वाचा...बीडमध्ये पुन्हा भाऊ आणि बहिणीचा वाद पेटणार, पंकजांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप दरम्यान, मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. ते राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं किल्लेदार यांनी सांगितलं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maharashtra, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या