Home /News /mumbai /

'ती क्लिप माझ्याकडे आहे, अटक टाळायची असल्यास 2 कोटी दे'; लाचखोर पोलिसाला रंगेहाथ अटक

'ती क्लिप माझ्याकडे आहे, अटक टाळायची असल्यास 2 कोटी दे'; लाचखोर पोलिसाला रंगेहाथ अटक

Crime in Parbhani: अपघाती मृत्यूसंबंधीच्या गुन्ह्यांत न अडकवण्यासाठी (To avoid arrest) एका तरुणाकडे 2 कोटी रुपयांची मागणी (2 crore demand) करणाऱ्या परभणीतील एका पोलीस अधिकाऱ्याला आणि कॉन्स्टेबलला एसीबीनं रंगेहाथ अटक केली आहे.

    मुंबई, 25 जुलै: अपघाती मृत्यूसंबंधीच्या गुन्ह्यांत न अडकवण्यासाठी (To avoid arrest) एका तरुणाकडे तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी (2 crore demand) करणाऱ्या परभणीतील एका पोलीस अधिकाऱ्याला आणि कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकानं अटक केली आहे. आरोपी पोलीस उपअधीक्षकानं मोबाइलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio Clip) आपल्याकडे असून अटक टाळायची असेल तर दोन कोटी दे, अशी मागणी केली होती. या रक्कमेतील पहिला हफ्ता देतानाच मुंबईच्या विशेष पथकानं आरोपीला रंगेहाथ अटक (Red handed arrest) केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. राजेंद्र रामकरण पाल (वय-55) असं अटक केलेल्या पोलीस उपअधीक्षकाचं नाव आहे. तर गणेश लक्ष्मणराव चव्हाण असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. आरोपी राजेंद्र पाल हा परभणीतील सेलू विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होता. तर आरोपी चव्हाण हा पाल यांच्याकडे ऑर्डली म्हणून काम करत होता. दरम्यान लाचखोरी प्रकरणांत दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोन कोटींपैकी दहा लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना शुक्रवारी त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हेही वाचा-बंदुकीसोबत सेल्फी घेताना नवविवाहितेचा मृत्यू, वडिलांच्या विधानानं घटनेला नवं वळण नेमकं प्रकरण काय आहे? परभणी येथील सेलू पोलीस ठाण्यात 3 मे रोजी अपघाती मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्याची पत्नी आणि तरुणाच्या मित्राची मोबाइलवरील संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप आरोपी पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाल याच्या हाती लागली होती. आरोपीनं फिर्यादी तरुणाला 9 जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलवून तुझे मृत तरुणाच्या पत्नीसोबत झालेले संभाषण माझ्याकडे आहे. तुला जर या प्रकरणात अडकायचं नसेल तर दोन कोटी रुपये दे, अशी मागणी आरोपीनं केली होती. हेही वाचा-महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो केले व्हायरल, बुलडाण्यातील संतापजनक घटना पण फिर्यादी तरुणानं याची तक्रार थेट मुंबईच्या एसीबी कार्यालयात केली होती. दरम्यान शुक्रवारी कॉन्स्टेबल चव्हाण हा या रक्कमेतील पहिला दहा लाख रुपयांचा हफ्त घेण्यासाठी आला होता. दरम्यान पोलिसांनी सापळा रचून कॉन्स्टेबल चव्हाणला रंगेहाथ अटक केली आहे. यानंतर एसीबी पथकानं मुख्य आरोपी पालला देखील अटक केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: 2 arrested, Crime news, Mumbai, Parbhani

    पुढील बातम्या