कमला मिल आग प्रकरणात रात्री अटक झालेल्या तिघांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

कमला मिल आग प्रकरणात रात्री अटक झालेल्या तिघांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

कमला मिल आग प्रकरणात शनिवारी रात्री अटक झालेल्या तिन्ही आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

21 जानेवारी : कमला मिल आग प्रकरणात शनिवारी रात्री अटक झालेल्या तिन्ही आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिलमधला भागीदार रवी भंडारी, अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील आणि कंत्राटदार विनोद पांडे यांना काल मुंबई पोलिसांनी अटक केली. याआधी दोन्ही हॉटेल्सचे मालक आणि व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे.

काल अटक करण्यात आलेल्या तिघांची माहिती घेऊयात...

या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

1. रवी भंडारी

- कमला मिल लिमिटेडचा संचालक

कमला मिलमधल्या अनधिकृत बांधकामांसाठी जबाबदार

2. राजेंद्र पाटील

- अग्निशमन अधिकारी

वन अबव्हला फायर एनओसी दिल्याचा पालिकेच्या अहवालात ठपका

3. उत्कर्ष पांडे

- हुक्का सप्लायर

मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्हला हुक्का पुरवला

First published: January 21, 2018, 3:12 PM IST

ताज्या बातम्या