धक्कादायक! मुंबईत ऑन-ड्यूटी पोलीस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या

धक्कादायक! मुंबईत ऑन-ड्यूटी पोलीस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या

मुंबईतील पोलिस विभागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

  • Share this:

रमाकांत तिवारी (प्रतिनिधी) 

मुंबई, 24 डिसेंबर: मुंबईतील पोलिस विभागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ही काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... बापरे! 5000 लोकसंख्येचं गाव आणि सरपंचपदाचा लिलाव, 42 लाखांची लागली बोली

मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आयुष्य संपवलं आहे. सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. 2016 पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली.

त्याच्या पश्चात त्यांची दोन मुलं पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर काही कामाचा ताण होता का की अन्य काही कारण होतो याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई -विरारचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली आहे.

पोलीस दलात मोठी खळबळ..

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉस्टेबल गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेने मुंबई पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा...मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला! राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

सखाराम भोये यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जाऊ शकते, असं पोलीसांनी सांगितलं आहे. सखाराम भोये यांच्या कुटुंबात काही वाद सुरू आहेत का? त्यांच्या पत्नी भांडण झालं होतं का? या बाजूने देखील पोलीस तपास करत आहे,.  नेमके कोणत्या संकटात होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 24, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या