Home /News /mumbai /

...तर थेट पोलिसात गुन्हा दाखल होणार; मुंबईत कोरोनासंबंधी कठोर नियम

...तर थेट पोलिसात गुन्हा दाखल होणार; मुंबईत कोरोनासंबंधी कठोर नियम

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेनं आता कोरोनासंबंधी नियम (BMC tightens covid 19 norm) अधिक कठोर केले आहेत.

  मुंबई, 10 मार्च : मुंबईत कोरोना रुग्णांचं (coronavirus cases in mumbai) वाढतं प्रमाण पाहता आता मुंबई महापालिकेनं (BMC) मुंबईकरांवर कठोर निर्बंध लादायला (BMC tightens covid 19 norm) सुरुवात केली आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला जाईल. विशेषतः जे लोक होम क्वारंटाइनचा नियम मोडतील त्यांच्याविरोधात पोलीस केस केली जाईल (Police cases against those who skip home quarantine) असा इशारा बीएमएसीने दिला आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत दररोज तब्बल 22 ते 23 हजार चाचण्या कराव्या लागत आहेत. यामध्ये 98 टक्के रुग्ण हे पक्या इमारतीत राहणारे आहेत. तर केवळ 2 ते 3 टक्के रुग्ण हे झोपडपट्टी परिसरातील आहेत. सध्या लोक कोरोना नियमांंचं पालन करताना दिसत नाही आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणि पण लक्षणं न दिसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना होमा क्वारंटाइन केलं जातं आहे. जे लोक होम क्वारंटाइन राहणार नाहीत त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. तसंच जे लोक होम क्वारंटाइनचा नियम मोडतील त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं जाईल, असं बीएमसीनं सांगितलं आहे. तसंच  ज्या इमारतीत पाचपेक्षा जास्त कोरोना प्रकरणं आहेत त्या बिल्डिंगच्या नोटीस बोर्डवर फ्लॅट्सह त्या कोरोना रुग्णांची माहिती द्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत. हे वाचा - Covid19: कोरोनासाठी तज्ञांची 7 कलमी रणनीती; हॉटस्पॉटमध्ये केल्या जाणार चाचण्या शिवाय मुंबईकरांवर लॉकडाऊनचं सावट घोंघावत आहे. येणाऱ्या काळात मुंबईत रुग्णसंख्या वाढली, तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाबाबत माहिती देताना काकाणी म्हणाले की, आम्ही सध्या नियमाचं पालन करण्यावर भर देत आहोत. नागरिकांनी योग्य सहकार्य केलं, तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ येणार नाही. मुंबईतील विविध ठिकाणी आमची भरारी पथकं अचानक पाहणी करत आहेत. तसंच ज्या लोकांना विलगिकरणात ठेवलं आहे, त्यांची तपासणीही केली जात आहे. आपल्याकडे कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण टक्केवारीमध्ये कमी झाले आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. हे वाचा - जिममध्ये इनडोअर व्यायाम करताना मास्क घालावा का? वाचा काय सांगतं संशोधन मुंबईत कोरोनाशी दोन हात करण्याची सर्व तयारी झाली असल्याचं सांगताना काकाणी म्हणाले की, मुंबईत सध्या 60 टक्के बेड रिकामे आहेत. तर मुंबईत अनेक छोट्या छोट्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. शिवाय दर आठ दिवसात कोरोनाच्या परिस्थितीची सर्व माहिती घेतली जात आहे. तसेच मुंबई प्रशासनाकडून दररोज 40 हजार लोकांचं लसीकरण केलं जात आहे. येणाऱ्या काळात काही खाजगी रुग्णालयेही लसीकरण मोहिमेत सामावून घेतली जाणार आहेत.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus, Covid19

  पुढील बातम्या