तिनं राहत्या घरातच सुरू केला होता कुंटणखाना, मुली आढळल्या आक्षेपार्ह अवस्थेत

तिनं राहत्या घरातच सुरू केला होता कुंटणखाना, मुली आढळल्या आक्षेपार्ह अवस्थेत

आरोपी महिलेने तिच्या राहत्या घरातच वेश्याव्यवसाय सुरू केला होता. मोबाईल फोनवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो ती दररोज व्हाट्सअॅपद्वारे तिच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना शेअर करत होती.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट- पोलिसांनी कांदिवलीतील एका घरावर धाड टाकून वेश्याव्यवसायचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. घरात तीन तरूणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी दलास महिला आणि तीन मुलींना ताब्यात घेतले आहे.

कांदिवली पश्चिमेकडील सेक्टर- 2 मध्ये प्लॉट क्रमांक 5 मध्ये अवैध वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडे तक्रार आली होती. त्यानुसार शनिवारी (10 ऑगस्ट) पोलिसांनी धाड टाकून राहत्या घरातील वेश्याव्यवसायचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 370 (3, 4, 5) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्राहकांना व्हाट्सअॅप करायची मुलींचे फोटो...

आरोपी महिलेने तिच्या राहत्या घरातच वेश्याव्यवसाय सुरू केला होता. मोबाईल फोनवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो ती दररोज व्हाट्सअॅपद्वारे तिच्या संपर्कात असलेल्या ग्राहकांना शेअर करत होती. त्यानंतर ग्राहक महिलेच्या घरी जाऊन मुलगी पसंत करायचे. महिलेच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये ग्राहकांना पाठवून वेश्याव्यवसाय चालवीत होती. तीन मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याने महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सावत्र मुलीला दाखवला मॉडेलचा अश्लील फोटो..

आपल्या सावत्र मुलीला मोबाइलवर एका मॉडेलचा अश्लील फोटो दाखवला, तसेच तिला शिवीगाळ करत तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्या प्रकरणी सुपरहिट टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की'- सीजन 1 फेम अभिनेत्री श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहली याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे श्वेता तिवारीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

श्वेता तिवारी हिने पती अभिनव कोहलीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर सावत्र मुलीचा विनयभंग केल्याच्या श्वेता हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनव कोहलीला अटक केली आहे. अभिनव कायमच दारुच्या नशेत असतो. त्याने 18 वर्षीय सावत्र मुलगी पलकचा शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचे श्वेताने तक्रारीत म्हटले आहे. श्वेताच्या तक्रारीवरून मुंबईतील समतानगर पोलिसांनी अभिनवला रविवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये श्वेता-पलकच्या उपस्थितीत अभिनवची चार तास कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अभिनवविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महापुरानंतर सांगली सावरतेय, पाहा हा DRONE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 07:49 PM IST

ताज्या बातम्या