हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अशी जाहिरात करून पुरवल्या जायच्या महिला

पवई येथील एका हॉटेलवर गुन्हे शाखेने छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या कॅशिअरला पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:12 PM IST

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अशी जाहिरात करून पुरवल्या जायच्या महिला

मुंबई, 20 ऑगस्ट- पवई येथील एका हॉटेलवर गुन्हे शाखेने छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या कॅशिअरला पोलिसांनी अटक केली आहे. मनोज पुजारी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

अशी जाहिरात करून पुरवल्या जायच्या महिला...

सोशल मीडिया, वेबसाइटवर मोबाइल क्रमांक देऊन हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाची जाहिरात केली जात होती. या माध्यमातून हॉटेलमध्ये देहविक्रीसाठी महिला पुरवल्या जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष 7 च्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.या कामात पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला. त्याच्याकडून पवई येथील आरोपी एजंटला फोन करून हॉटेल रिलॅक्स इन रेसिडन्सी येथे पाठवले. ग्राहक हॉटेलच्या रूममध्ये पोहोचताच एजंटने तीन महिला रूममध्ये पाठवल्या. महिलांना ठरलेली रक्कम व कॅशिअरला रूमचे भाडे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या कॅशियरला अटक केली आहे. यातील आरोपी एजंट फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे

दहिसर (डायघर) पिंपरीनाका परिसरातील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी (18 ऑगस्ट) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 24 बारबालांसह 24 जणांना अटक केली.

Loading...

रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने बारवर छापा टाकला.

या प्रकरणी 14 बारबाला आदी 24 जणांना अटक केली. यात बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (42, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (38, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांचा समावेश आहे.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...