मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी सर्व सहा आरोपी महिला पोलिसांना अटक

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी सर्व सहा आरोपी महिला पोलिसांना अटक

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी ६ पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.

  • Share this:

01 जुलै : भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी जेल अधीक्षक मनीषा पोखरकर, बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक करण्यात आलीय.

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी ६ पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ५ दिवसांनी या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

२३ जूनच्या रात्री मंजुळाला मारहाण करण्यात आली होती. दोन अंडी व पाच पावाचा हिशोब न मिळाल्याने तिला मारहाण केल्याची पोलीस सुत्रांची माहितीये. या प्रकरणी जेल अधीक्षक मनीषा पोखरकर, बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे  या महिला जेल पोलिसांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First published: July 1, 2017, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading