मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /जेवणाचं बिल मागितल्याचा राग, मुंबई पोलिसाने केली कॅशिअरची धुलाई; पाहा VIDEO

जेवणाचं बिल मागितल्याचा राग, मुंबई पोलिसाने केली कॅशिअरची धुलाई; पाहा VIDEO

पोलिसाचे जेवण झाल्यावर वेटरने इतरांप्रमाणेच त्यालाही बिल दिले. मात्र या बाबीचा त्याला इतका राग आला की थेट कॅशिअरला मारहाण करायला सुरुवात केली.

पोलिसाचे जेवण झाल्यावर वेटरने इतरांप्रमाणेच त्यालाही बिल दिले. मात्र या बाबीचा त्याला इतका राग आला की थेट कॅशिअरला मारहाण करायला सुरुवात केली.

पोलिसाचे जेवण झाल्यावर वेटरने इतरांप्रमाणेच त्यालाही बिल दिले. मात्र या बाबीचा त्याला इतका राग आला की थेट कॅशिअरला मारहाण करायला सुरुवात केली.

cमुंबई, 24 डिसेंबर: मध्यरात्री हॉटेलमध्ये जाऊन (In the hotel) भरपेट जेवण (Dinner) केल्यावर वेटरने बिल (Waiter brings bill) आणून दिल्याचा राग आल्यामुळे पोलिसांने कॅशिअरची धुलाई (Police beaten cashier) केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात (Video Viral) जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांच्या दादागिरीचा नमुना या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आला आहे. रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये जेवणारा पोलीस बिल बघून इतका चिडला की त्याने थेट हाणामारी करायलाच सुरुवात केली.

अशी घडली घटना

मुंबईतील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यानंतर एका पोलीस इन्स्पेक्टर जेवण्यासाठी गेला. भरपेट जेवण केल्यावर वेटरने त्याला बिल आणून दिलं. आपल्याला वेटरनं बिल दिल्याचा पोलिसाचा प्रचंड राग आला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपण पोलीस असून आपल्याला एका हॉटेलमध्ये बिल दिलं जाणं, हा आपला अपमान आहे, असं वाटून त्याने आक्रमक पवित्रा घेतला.

कॅशिअरला केली मारहाण

वेटरने बिल दिल्यानंतर चिडलेला पोलीस जागेवरून उठला आणि थेट कॅश काउंटरकडे गेला. तिथं आपलं काम करत असलेल्या कॅशिअरला त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. आपलं काय चुकलं, हे कळायच्या आत कॅशिअरवर जोरदार हल्ला व्हायला सुरुवात झाली होती. पोलिसाने शिव्यांची लाखोली वाहत कॅशिअरला अक्षरशः धुवून काढलं. हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला.

हे वाचा - आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल

वर्दीचा गैरफायदा

पोलीस आपल्या वर्दीचा गैरफायदा घेत कशा प्रकारे सामान्यांची लुबाडणूक करतात, याची चर्चा या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आपल्याला वाटेल त्या हॉटेलमध्ये जेवण करायचं आणि आपल्याला बिल देखील मागू नये, ही अपेक्षा करायची. बिल मागितलं तर दादागिरी करत कॅशिअरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायची यासारख्या वर्तणुकीमुळे पोलीस दलाची प्रतिमा खालावत असल्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. काही निवडक पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया या व्हिडिओवर नागरिक देत आहेत.

First published:

Tags: Mumbai police, Video viral