News18 Lokmat

मराठा संवाद यात्रेला रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर नाकेबंदी, 7 जण ताब्यात

मराठा आरक्षण जाहीर करण्यात यावं, याआधीच्या आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेतले जावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. ताब्यात घेण्यात आलेले सर्व कार्यकर्ते सोलापूरचे जिल्हातील आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 01:52 PM IST

मराठा संवाद यात्रेला रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर नाकेबंदी, 7 जण ताब्यात

मुंबई, 26 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 7 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी या त्यांना ताब्यात घेतलं.

मराठा आरक्षण जाहीर करण्यात यावं, याआधीच्या आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेतले जावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. ताब्यात घेण्यात आलेले सर्व कार्यकर्ते सोलापूरचे जिल्हातील आहेत. महाराष्ट्रातील इतरही काही ठिकाणी मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे.

मराठा संवाद यात्रा विधानभवनावर धडकणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेली संवाद यात्रा आज मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक विधानभवनावर धडक देणार आहेत. मात्र यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या कामोठे पोलीस स्थानक आणि कळंबोली वाहतूक शाखा यांनी मुबंई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, हा गैरसमज असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरपासून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची घोषणा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली होती. ही यात्रा सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे.

Loading...

या संवाद यात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईत पोहचू नये, म्हणून हा बंदोबस्त लावला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

'मराठा समाजाने मुंबईत आज आंदोलन करू नये'

'मराठा क्रांती मोर्चाने आज (सोमवारी)मुंबईत आंदोलन करू नये, असं त्यांना सांगितलं होतं. कारण आज 26/11 घटनेला 10 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरण संवेदनशील आहे,' अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

'सरकार हे आंदोलन चिरडत नाही. तसंच काही लोकांनी या आंदोलनाला हवा देऊ नये,' असा अप्रत्यक्ष टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना लगावला.


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRALबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...