मुंबई, 8 डिसेंबर : पनवेल परिसरात एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला होता. या व्यापाऱ्याची हत्या झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सचिन पवार याला अटक केली आहे. सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव आहे.
राजेश्वर असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचं नाव असून त्याचा मृतदेह पनवेल इथं सापडला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. पण आता या व्यापाऱ्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, हत्या झालेल्या हिरा व्यापाऱ्याचा अनेक टीव्ही कलाकारांपासून ते डान्स बारमधील मुलींसोबतही संबंध होता, अशी माहिती आहे. याच संबंधामुळं व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
हिरे व्यापाऱ्याच्या या हत्येप्रकरणी प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतलं. त्यानंतर आज सचिन पवारला भाईवाडा कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
घाटकोपर इथला रहिवासी असणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी 28 नोव्हेंबरपासून गायब होता. त्यानंतर पनवेल इथं त्याचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांनी सचिन पवारला अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'साचिन पवार आणि माझा कशाही प्रकारे संपर्क आणि संबंध नाही. 2004 ते 2009 या कालावधीत तो माझ्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यामुळे पक्षाने त्याच्यावर कारवाई करत त्याला पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून आजपर्यंत या व्यक्तीशी माझा संपर्क झालेला नाही,' असं प्रकाश मेहता म्हणाले.
VIDEO : राज्यात मुदतीआधीच उडणार निवडणुकांचा बार? पाहा स्पेशल रिपोर्ट
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा