मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एका चपलेवरून लागला आरोपींचा शोध, फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांना अटक

एका चपलेवरून लागला आरोपींचा शोध, फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांना अटक

दरोडेखोरांची एक चप्पल बँकेतच राहिली. त्यावरून पोलिसांनी सूत्रं फिरवली आणि आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.

दरोडेखोरांची एक चप्पल बँकेतच राहिली. त्यावरून पोलिसांनी सूत्रं फिरवली आणि आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.

दरोडेखोरांची एक चप्पल बँकेतच राहिली. त्यावरून पोलिसांनी सूत्रं फिरवली आणि आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.

    मुंबई, 30 डिसेंबर: बँकेवर (Bank Dakait) सशस्त्र दरोडा घालून लाखो रुपये लंपास करणाऱ्या दरोडेखोरांना (Criminals) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जेरबंद (Arrested) केलं आहे. मुंबईतील दहिसर परिसरातील बँकेवर सशस्त्र दरोडा टाकून हे आरोपी फरार झाले होते. दरोड्याच्या घटनेनंतर बँकेत दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी घटनेच्या ठिकाणी एका दरोडेखोराची चप्पल पडल्याचं पोलिसांना दिसलं. ही चप्पलच आपल्याला दरोडेखोरांपर्यंत पोहोचवू शकते, असं तपास अधिकाऱ्यांना वाटलं आणि त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला.  असा पडला दरोडा दोन आरोपींनी बुधवारी स्टेट बँकेवर दरोडा घातला होता. बिहारमधून शस्त्रास्त्रं घेऊन आलेले आरोपी शस्त्रांचा धाक दाखवत बँकेत शिरले आणि त्यांनी रक्कम चोरली. बँकेतून अडीच लाख रुपये लुटून ते फरार झाले होते. या झटापटीत एका कर्मचाऱ्याला गोळी लागली होती आणि तो जखमी झाला होता. आरोपी नेमके कुठल्या दिशेला पळून गेले, याचा कुठलाही मागमूस पोलिसांना लागत नव्हता. मात्र अचानक पंचनामा करताना घटनास्थळी एक चप्पल पडल्याचं पोलिसांना दिसलं. त्या चपलेवरून आरोपीचा माग काढता येतो का, याच प्रयत्न अधिकाऱ्यांनी सुरू केला. स्नीफर डॉगनं केली मदत घटनास्थळी एका स्नीफर डॉगला बोलावण्यात आलं. त्यानं चपला हुंगून आरोपीच्या घरापर्यंत माग काढला. या घराचं दार आतून बंद करण्यात आलं होतं. पोलिसांनी हाका मारूनही आतून कुणीच दरवाजा उघडत नसल्यामुळे संशय़ बळावला आणि दार तोडून फिल्मी स्टाईलनं पोलिसांनी आत प्रवेश केला. तिथं मुख्य आरोपी विकास लपून बसला होता. त्याच्याकडून त्याच परिसरात दुसरा आरोपी धर्मेंद्र असल्याचंही पोलिसांना समजलं. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.  हे वाचा - मुख्य आरोपी विकासनं काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्रला बिहारवरून बोलावून घेतलं होतं. आपल्याला पैशांची गरज असल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचं त्यानं म्हटलं आहे. विकास हा मुंबईत भाजी विकण्याचं काम करत असे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Mumbai Poilce, Police arrest

    पुढील बातम्या