तुम्ही खरेदी करत असलेली सोन्याची बिस्कीटं बनावट तर नाहीत?

मुंबईत सोन्याची बनावट बिस्कीटं विकण्याचा पोलिसांनी हाणून पाडला डाव.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 07:18 AM IST

तुम्ही खरेदी करत असलेली सोन्याची बिस्कीटं बनावट तर नाहीत?

सत्यम सिंग (प्रतिनिधी) मुंबई, 10 नोव्हेंबर: सोन्याचा मुलामा दिलेली बनावट बिस्कीटं विकून पैसे उकळणारी टोळी सक्रीय असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या टोळीतील एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. सोन्याच्या बिस्कीटांसारखा आकार देऊन त्याला सोन्यासारखा चकाकणारा रंग देऊन सराफांना गंडा घालण्याचा प्रयत्न टोळीकडून केला जात होता. पण हा कट पोलिसांनी हाणून पाडला.  मुंबईत सोन्याची बनावट बिस्कीटं विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जातोय. सराफाला कमी किंमतीत सोन्याची बिस्कीटं विकत असल्याचा उघड झालं.

एका सराफ झवेरी बाजारात गेला असताना त्याला अज्ञात व्य़क्तीनं कमी दरात सोनं देतो असं सांगितलं आणि त्याचा नंबर घेतला. अज्ञात व्यक्तीचा सराफाला फोन आला. 'माझ्याकडे सोन्याची बिस्कीटं आहेत. ती मी 20 हजार रुपये प्रति 10 ग्राम या दरानं विकणार आहे. तुम्ही ती बिस्कीटं खरेदी करणार का?' सराफाला या फोननंतर संशय आला आणि सोन्याचे चढते भाव असताना एवढ्या कमी किमतीमध्ये सोनं दिलं जातंय; म्हणजे काहीतरी गडबड आहे. असा विचार करत त्याने त्याने थेट पोलीस स्थानक गाठले. सराफाने घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.

या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. सोन्याच्या बिस्कीटाची तपासणी केली असता त्यावर फक्त सोन्याचा रंग चढवल्याचं समजलं. याप्रकरणी चौकशी सुरु असून अद्याप एक आरोपी फरार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सराफाला गंडा घालणाऱ्या एका टोळीचा डाव हाणून पाडलाय. पण यांसारख्या आणखी टोळी मुंबईत सक्रीय असल्याचं तरी याप्रकरणावरून तरी समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी सराफांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 07:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...