News18 Lokmat

झायरा वसीमची तक्रार घेण्यासाठी हयात हॉटेलमध्ये पोहोचले मुंबई पोलीस

मुंबईत हयात हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी तिची तक्रार घेतली. पोलीस आता पुढचा तपास करतायेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2017 01:13 PM IST

झायरा वसीमची तक्रार घेण्यासाठी हयात हॉटेलमध्ये पोहोचले मुंबई पोलीस

10 डिसेंबर : दंगल चित्रपटातली अभिनेत्री झायरा वसीमशी विमानात विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत तिची तक्रार घेण्यासाठी मुंबई पोलीस झायराच्या हॉटेलवर गेले होते. मुंबईत हयात हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी तिची तक्रार घेतली. पोलीस आता पुढचा तपास करतायेत.

दिल्लीहून मुंबईला येताना झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मध्यमवयीन पुरुषानं अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला. तिच्या मानेला आणि पाठीला स्पर्श करायचा त्यानं प्रयत्न केला. झायरानं विमानातच व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. पण तिथे प्रकाश कमी होता.

विमानातून उतरल्यावर तिनं आणखी एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत तिला अश्रू अनावर झाले. कुणी असं कसं वागू शकतं.आम्हा मुलींनाच आमचं संरक्षण करावं लागणार आहे. इतर कुणीही पुढे येणार नाहीये, असं ती या व्हिडिओत म्हणालीये.

राज्य महिला आयोगानं या घटनेबाबत कडक भूमिका घेतलीय. ते विस्तारा आणि डीसीसीएला नोटीस पठवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...