घोटाळेबाजांवर कारवाई होणारच, पीएनबीचे एमडी सुनील मेहतांचं आश्वासन

हा घोटाळा बँकेनेच उघडकीला आणला असंही त्यांनी म्हणलंय. तर गैरव्यवहारात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील तर यासर्वप्रकरणात माध्यमांना सहकार्य करण्याचंही त्यांनी आवाहन केलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2018 04:00 PM IST

घोटाळेबाजांवर कारवाई होणारच, पीएनबीचे एमडी सुनील मेहतांचं आश्वासन

15 फेब्रुवारी : पीएनबी बँकेत झालेल्या घोटाळ्याबाबत पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी पत्रकार परिषद घेतलीय. घोटाळाबाजांना सोडणार नाही  आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर लवकरात लवकर करवाई होणार अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. तर हा घोटाळा बँकेनेच उघडकीला आणला असंही त्यांनी म्हणलंय. तर गैरव्यवहारात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील तर यासर्वप्रकरणात माध्यमांना सहकार्य करण्याचंही त्यांनी   आवाहन केलं.

मुंबईतील एका शाखेतून ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी हा बेकायदा व्यवहार होत होता. घोटाळ्याची ही रक्कम बॅंकेच्या एकूण बाजार मुल्याच्या (मार्केट कॅपिटलायझेशन) जवळपास एक तृतियांश आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेच्या शेअर्सना 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकांनाही त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त होतेय.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार पंजाब नॅशनल बॅंकेचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रूपये आहे आणि त्यांनी जवळपास 4.5 लाख कोटी रूपये मार्केटमध्ये कर्ज दिलं आहे. बॅंकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणुकदारांना एक दिवसात जवळपास 3 हजार कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये असल्याची न्यूज 18 नेटवर्कची माहिती आहे. तर नीरव मोदी देश सोडून गेल्याबाबत कुठलीही माहिती नाही, असं गृहमंत्रालयानं म्हटलंय. तसंच नीरव मोदी 5 हजार कोटी परत करायला तयार अशी सूत्रांची माहिती आहे.

त्यानंतर नीरव मोदीच्या काला घोडा इथल्या ऑफिसवर आणि शोरुमवर ईडीनं छापे टाकलेत. एकूण 12 ठिकाणी ईडीचे छापे टाकलेत. नीरव मोदीनं देशातून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...