PMC बँक घोटाळ्याचा सातवा बळी.. खातेधारक महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू

PMC बँक घोटाळ्याचा सातवा बळी.. खातेधारक महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू

पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेने आणखी एक बळी घेतला आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे,(प्रतिनिधी)

मुंबई,1 नोव्हेंबर:पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या विग कुटुंबीयांमधील  64 वर्षीय कुलदीप कोर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पीएमसी बँकेत वीग कुटुंबीयांचे 15 लाखांच्या ठेवी आहेत. हे पैसे मिळतील की नाही यांची चिंता त्यांना सतावत होती. आपल्या पैशांचे काय होणार, या धास्तीने आतापर्यंत सात खातेदारांवर मृत्यू ओढवला आहे.

वीरेंद्र विग हे खारघर मध्ये भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा सून, तसेच त्याची विधवा मुलगी आपल्या दोन मुलांसोबत राहत आहे. या मुलीसाठी त्यांनी 15 लाखांच्या ठेवी खारघरमधील  पीएमसी बँकेच्या शाखेत ठेवल्या होत्या. पण बँकेवर निर्बंध आल्याने पैसे आणि ठेवी बुडणार, अशी भीती वरींदर विग यांची पत्नी कुलदीप कोर यांना होती. यामुळे त्या रोज पीएमसी बँक संदर्भात बातम्या बघत असत. असेच बुधवारी त्या जेवणानंतर बातम्या बघत होत्या. पीएमसी बॅंक खातेदार आरबीआयसमोर आंदोलन करताना त्यांनी टीव्हीवरील बातम्यांमध्ये पाहिले. आपले पैसे मिळतील का अशी चिंता व्यक्त केली. रात्री 11 वाजता झोपायला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वीरेंद्र विग यांनी सांगितले.

आमचा पैसा सुरक्षित राहील या आशेने पीएमसी बॅंकेत आम्ही ठेवला होता. बॅंकेची शाखा शहरातील प्रत्येक कॉलनीत आहे. बँक सातही दिवस सुरू राहते, त्यामुळे आम्ही बॅंकेवर विश्वास ठेवला होता. आरबीआय आणि सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळत नाही आहे. त्यामुळे पीएमसी बँकेत अडकलेले पैसे भविष्यात मिळतील की नाही, हिच चिंता सतावत असल्याचे वीरेंद्र विग यांनी सांगितले.

पैसे काढण्याची मर्यादा वाढवली..

PMC बँकेच्या 4 हजार 355 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. पीएमसी बँक संकटात अडकली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये केली होती.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या