PMC बॅंक घोटाळ्याने घेतला चौथा बळी, उपचाराअभावी खातेधारकाचा मृत्यू

PMC बॅंक घोटाळ्याने घेतला चौथा बळी, उपचाराअभावी खातेधारकाचा मृत्यू

पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याने चौथा बळी घेतला आहे.

  • Share this:

मुंबई,18 ऑक्टोबर: पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याने चौथा बळी घेतला आहे. बॅंक खाताधारक मुरलीधर ढर्रा (रा.मुलुंड) यांचे शु्क्रवारी निधन झाले. मुरलीधर ढर्रा यांचे बॅंकेत पैसे अडकले आहेत. पैशाअभावी त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार घेता आले नाही. त्यामुळे मुरलीधर ढर्रा यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.गेल्या दोन दिवसांत तीन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमध्ये रोष वाढला आहे. फट्टोमल पंजाबी, संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर डॉ.निवेदिता बिजलानी यांनी आत्महत्या केली.

डॉक्टर महिलेने आत्महत्या

बँकेतील पैशाच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या डॉ. निवेदिता बिजलानी यांनी आत्महत्या केली. 39 वर्षीय बिजलानी या आपल्या वडीलांसोबत वरसोवा मॉडेल टाउन या परिसरात राहत होत्या. सोमवारी रात्री बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या. बिजलानी यांचे खाते पीएमसी बँकेत होते. मात्र, बँकेतील पैशाच्या तणावातून बिजलानी यांनी आत्महत्या केली असेल असे वाटत नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेतदेखील बिजलानी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

दुकान कसं चालवायचं..

पीएमसी बँकेत पैसे अडकल्याने दुकान कसे चालवायचं ? या चिंतेत असतानाच फट्टोमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. पंजाबी हे मुलुंडमधले रहिवाशी आहेत. फट्टोमल पंजाबी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. फट्टोमल यांच्या खात्यात 8 ते 9 लाख रुपये होते. दुपारी फट्टोमल यांना दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बँकेविरोधात केलेल्या आंदोलनात फट्टोमलदेखील सहभागी होते. ज्या कॉलनीमध्ये राहतात त्या कॉलनीतील 95 टक्के लोकांची बँक खाती ही पीएमसी बँकेत आहेत.

दरम्यान. 51 वर्षीय संजय गुलाटी यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे या बँकेत जास्त पैसे जमा होते. जवळपास 90 लाख रूपये त्यांच्या बँकेत फसले होते. ज्यामुळे ते खूप त्रस्त होते. संजय हे मृत्यू होण्याआधी बँकविरूद्ध केलेल्या आंदोलनातही सहभागी झाले होते. आंदोलन झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी हे ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधल्या पीएमसी बँकेच्या ब्रॅंन्चमध्ये त्यांचे खाते होते.

साडेदहा हजार कोटींची रोकड गायब

पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात आता नवा खुलासा समोर आहे. पीएमसी बँकेच्या रेकॉर्डमधून साडेदहा हजार कोटींची रोकड गायब झाली आहे. अंतर्गत चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

प्रदीप शर्मांसाठी उद्धव ठाकरेंची सभा, वसईतून हितेंद्र ठाकूरांना दिला थेट इशारा

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2019, 5:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading