PMC खातेदारांसाठी मोठी बातमी, आता काढता येणार एवढी रक्कम

PMC खातेदारांसाठी मोठी बातमी, आता काढता येणार एवढी रक्कम

RBIच्या या निर्णयामुळे बँकेच्या शेकडो खातेदारांना मोठा दिलासा मिळणार असून तातडीच्या कामासाठी पैशांची मदत मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई 19 नोव्हेंबर : पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (Punjab and Maharashtra Cooperative Bank) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आलेल्या ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने एक मोठा दिलासा दिला असून आता एक लाखापर्यंतची रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. खातेदाराला काही वैद्यकीय खर्चासाठी तातडीने पैश्यांची गरज असल्यास ही रक्कम काढता येणार आहे. ही माहिती RBIने उच्च न्यायालयात दिलीय. तातडीच्या कामासाठी जादा पैसे काढण्याची परवानगी मिळावी अशी मागणी खातेदारांनी केली होती. RBIने याबाबतचं प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केलं त्यात ही गोष्ट नमूद करण्यात आलीय. शिक्षण, लग्न किंवा अन्य कारणांसाठी सध्या 50 हजारांची रक्कम काढण्याची मुभा आहे. खातेदारांच्या हितासाठीच अशा प्रकारचे नियम घालण्यात आल्याचंही RBIने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Reliance Jio चे दर ठरणार ट्रायच्या नियमांनुसारच, कंपनीचं स्पष्टीकरण

पैसे काढताना ही माहिती द्या

एखाद्या खातेदाराच्या घरात मेडिकल इमर्जन्सी असेल तर संबंधित डॉक्टरकडून याचा अंदाजे खर्च काढावा लागेल. यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट, उपचाराची बिलं ही सगळी कागदपत्रं जमा करावी लागतील.

ज्येष्ठ नागरिकांनाही 50 हजार रुपये काढायचे असतील तर वयाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. अपंगांनीही यासाठी प्रमाणपत्र द्यायचं आहे.लग्नासाठी रक्कम काढायची असेल तर इनव्हिटेशन कार्ड, हॉल बुकिंगची पावती, दागिन्यांची पावती हे सगळं द्यावं लागेल. बँकेमध्ये जमा असलेल्या असलेली 1 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित असते. पण ही सुरक्षित रक्कम वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे

बँकेच्या 135 शाखा

PMC बँकेमध्ये आर्थिक अनियमतता आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्याची कारवाई केली होती. या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती . PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखांमध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत. RBI च्या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाहीत. तसंच नव्या ठेवीही स्वीकारता येणार नाहीत.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 19, 2019, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading