मुंबई, 01 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena mla sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (varsha raut) यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
एनएआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृतानुसार, ईडीने पीएमसी बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे 72 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. अखेर या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे.
Enforcement Directorate attaches properties worth Rs 72 crores belonging to Pravin Raut under Prevention of Money Laundering Act in a PMC Bank loan cheating case: ED
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. पण राऊत यांनी ईडीकडे यासाठी मुदत मागितली होती.
काय आहे प्रकरण?
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.