Home /News /mumbai /

मुंबईसाठी Good News, ‘कोरोना टेस्ट’साठी सुरू होणार आता हायटेक लॅब

मुंबईसाठी Good News, ‘कोरोना टेस्ट’साठी सुरू होणार आता हायटेक लॅब

पुण्याचा रिकव्हरी रेटही देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे हॉटस्पॉट झालेल्या पुण्यात आता कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून तो कायम ठेवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.

पुण्याचा रिकव्हरी रेटही देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे हॉटस्पॉट झालेल्या पुण्यात आता कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून तो कायम ठेवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.

देशात अशा प्रकारच्या तीन अत्याधुनिक लॅब सुरु होत असून त्यामुळे एकाच दिवसात तब्बल 10 हजार रुग्णांच्या चाचण्या (Covid-19 Samples) करणं शक्य होणार आहे.

    मुंबई 26 जुलै: महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच एक दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी मुंबईत आणखी एक अत्याधुनिक लॅब सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  या प्रयोगशाळेचं उद्घाटन करणार आहे. सोमवारी 27 जुलैला हे उद्घाटन होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (CM Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे. देशात अशा प्रकारच्या तीन अत्याधुनिक लॅब सुरु होत असून त्यामुळे एकाच दिवसात तब्बल 10 हजार रुग्णांच्या चाचण्या (Covid-19 Samples)  करणं शक्य होणार आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्यात ICMRच्या मदतीने या लॅब्स सुरु होणार आहेत. आज राज्यात 9 हजार 431 नवीन रुग्ण आढळले (New Corona Patient) आहेत तर 6044 रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे. मुंबईत COVID-19 रुग्णांची सेवा करणाऱ्या 144 नर्सेसना 3 महिन्यांपासून पगारच नाही राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा  आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली. देशात 24 तासांत 64% रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढत आकडा पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येतं. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजही उच्चांकी 9431Corona रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 3,75,799वर देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केंद्राची चिंता वाढली आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. PMOच्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या