मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचं लोकार्पण होईल. यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता पंतप्रधान अल्जामिया-तुस-सैफियाहच्या भागाचं उद्घाटन करणार आहेत. अल्जामिया-तुस-सैफियाह दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैयदाना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनात ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे.
(Vande Bharat Express Train : मुंबई-सोलापूर 'वंदे भारत'ची सर्व माहिती वाचा एका क्लिकवर)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आज शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत गाड्या सुरू होत आहे. सोलापूरातील धार्मिक स्थळं, कापड उद्योग आणि शिर्डी इथलं साईबाबा मंदिर, पुण्यातील शैक्षणिक केंद्रांपर्यंतचा प्रवास या गाडीमुळे अधिक जलद होणार आहे.
('मी शरद पवारांना कायमच...', पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्ला, पवारांचं कौतुक)
देशातल्या दहा वंदे भारत एक्स्प्रेस पैकी तीन गाड्यात आता महाराष्ट्रातून धावणार आहेत. यापूर्वी मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस धावत होती. त्यात आता आणखी दोन गाड्यांची भर पडणार आहे.
विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यातच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसंच, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Narendra Modi