Home /News /mumbai /

देशाच्या पंतप्रधानांचा सुरक्षा रक्षकच असुरक्षित! भामट्याने खास कमांडोचं पाकीट केलं लंपास

देशाच्या पंतप्रधानांचा सुरक्षा रक्षकच असुरक्षित! भामट्याने खास कमांडोचं पाकीट केलं लंपास

SPG कमांडोंच्या (SPG Commando) अत्यंत हुशार आणि आश्वासक सैनिकांवर नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. पण पंतप्रधान मोदींचं रक्षण करणारा एसपीजी कमांडोच खिशेकापूचा बळी ठरला.

    मुंबई, 27 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचं संरक्षण करण्यासाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. पीएम मोदींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्यांकडून कसलीही चूक होण्यास जागा नाही. कारण SPG कमांडोंच्या (SPG Commando) अत्यंत हुशार आणि आश्वासक सैनिकांवर नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. पण मुंबईतून एक विचित्र घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं रक्षण करणारा एसपीजी कमांडो खिशेकापूचा बळी ठरला. लोकलमधून प्रवास करत असताना, अज्ञातानं त्यांच्या खिशावर डल्ला मारला आहे. लोकलमधील भामट्यानं अत्यंत शिताफीनं पीएम मोंदीच्या सुरक्षा रक्षकाचं  पाकीट लंपास (SPG Commando wallet theft) केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एसपीजी कमांडो मुंबईतील विलेपार्लेहून महालक्ष्मीकडे लोकल ट्रेनमधून प्रवास करत होते. दरम्यान एका भामट्याने संबंधित एसपीजी कमांडोचा खिसा रिकामा केला आहे. चोरट्यानं कमांडोच्या खिशातील पैशांचं पाकीट चोरून नेलं आहे. आपलं पाकीट चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर, संबंधित कमांडोनं अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन जणांना अटक केली आहे. हेही वाचा-पतीच्या निधनानंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडमधील घटना यावेळी पोलिसांनी आरोपींकडून अनेक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त केले आहेत. आरोपींनी यापूर्वी देखील अशाप्रकारे अनेकांचे खिशे कापले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चोरटे पाकिटांमधून सापडलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून अवैध पद्धतीनं पैसे काढून घेत होते. अंधेरी पोलिसांनी पाकीटमार टोळीचा पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-बीडमध्ये काहीही होऊ शकतं! एकाच नंबरच्या सापडल्या 9 ऑटोरिक्षा, पोलीस हैराण खरंतर, मुंबईत सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असताना दररोज शेकडो लोकं चोरीच्या घटनांना बळी पडतात. अशा परिस्थितीत अंधेरी पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. त्यामुळे लोकलमध्ये घडणाऱ्या चोरीच्या घटना काही प्रमाणात कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या